Skip to main content

Posts

Showing posts from 2016

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय, जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय, आज ६ महिने उलटून गेले, दररोज सकाळ होत असतेय, खूप सारी माणसं भेटतात असतायत, एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल, आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या, आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय, इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय, पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय, अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय, पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय, गप्पांच्या फडाची सवय आपल्याला, आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय, वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय, फक्त हिशोब लागला की त्रास होतोय.. तुमचा हरवलेला मित्र

राजा माणूस : सौरभ

           पाचवीला गेल्यावर घरच्यांनी शिक्षणासाठी खेड्यातून शहरात अर्थात बारामतीला जायचा निर्णय घेतला. माझा दाखला तालुक्यातील नामवंत शाळेत म्हणजेच म.ए.सो.विद्यालयात घालण्यात आला. शाळेत आल्यावर इथलं सगळं वातावरण अगदी नवीन होतं. सवय जिल्हा परिषद शाळेची- इथे अगदी एकच शिक्षक तेही दोन वर्गांना मिळून. त्यांना वाटेल तो विषय दिवसभर चालणार. इथं आल्यावर मोठी पंचाईत झाली होती. प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे, दर अर्ध्या तासाला मास्तर बदलणार, वेळापत्रक ठरलेलं, हुशारीप्रमाणे(गुणपत्रकावरच्या) तुकड्याही वेगळ्या. ह्या सगळ्या गोंधळात आम्हाला काही नवीन मित्र मिळाले. प्रगतीनगरचा पल्ल्या, कसब्यातला अक्षय, कॅनॉल रोडचे भोई बंधू, अशोकनगरमधील देशपांडेंचे गौरव आणि देवदत्त अन बाकीचे भरपूर जण. पण या सगळ्यात वेगळे होते ते आमचे चंगु मंगू अर्थात ओंकार आणि सौरभ पवार. मी पाहिलेलीआणि शाळेतली एकमेव जुळ्या भावांची जोडी.        एक भाऊ आमच्या अ तुकडीत अन दुसरा ब तुकडीत. एकदम राम-लक्ष्मणाची जोडी. तब्येत दोघांचीही कायम कमीच, दिसायला दोघंही देखणे गडी. पण ना रामाला कधी सीता भेटली ना लक्ष्मणाने कधी शोधली. तसं बघायला गेलं तर दो

कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे..

कालही तो पाऊसच होता आजही कारण तो पाऊसच आहे, कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत, कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत, जनता कालही तीच होती आजही तीच आहे, कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत, काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती, आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत... खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत, एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना, आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा, पण जीवाला जपा, पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे.. आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा... कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे, तुमचाच मित्र, वृषाल

एक परी असावी..

आयुष्यात एक परी असावी, एका नजरेत डोळ्यातले अश्रू पुसणारी अन् एका हाकेमध्ये मनात प्रेमळ धडकी भरणारी, एका स्मितहास्यात जगाचा विसर पाडणारी अन वेळ पडली तर एका धपाट्यात भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणणारी, दिवसातून विनाकारण १०वेळा ओरडली तरी केवळ एका वाक्याच्या कौतुकाने भारावून जाणारी.. आयुष्यात एकतरी परी असावी.. कधी कळत कधी नकळत तुम्हाला तुमच्यातूनच हरवणारी पण तरी एका गोड शब्दात जिंकल्याचा आभास करून देणारी.. वृषाल भोसले २०/०७/२०१६

तो इंजिनियर हो तुम..

....तो इंजिनियर हो तुम.... बॅग में सिर्फ एक नोटबुक ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, पॉकेट में दुसरे का पेन ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, हर सेमिस्टर में एक नयी नोटबुक लेना सिखो, उसके हर पन्ने पर कुछ लिखना सिखो, हर टीचर से मिलो तो वो खोले तुम्हारा नोटबुक, हर पन्ने पर नया सब्जेक्ट देखे उस टीचर कि निगाहे, जो अपने नोटबुक में शायरिया ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, बॅग में सिर्फ एक नोटबुक ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, तो इंजिनियर हो तुम... दो लेक्चर के अटेंडन्स के लिये सेमिनार दे रहे हो तो इंजिनियर हो तुम, एक प्रॉक्झी के लिये भिक मांग रहे हो तो तो इंजिनियर हो तुम, एक हफ्ते में ४लेक्चर कर के शान से रहना सिखो, तुम डिफॉल्टर बन के नोटीस बोर्ड पर झलकना सिखो, हर टीचर से मिलो तो टीचर खोले अपना अटेंडन्स शीट, हर दिन मारी हुई नयी प्रॉक्झी देखे उस टीचर कि निगाहे, जो अपने मोबाईल मे अटेंडन्स की कॅलक्युलेशन कर रहे हो तो इंजिनियर हो तुम, दो लेक्चर के अटेंडन्स के लिये सेमिनार दे रहे हो तो इंजिनियर हो तुम.... तो इंजिनियर हो तुम.... ©वृषाल भोसले

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप्याला मान. कारण आमचा बोलण्यात कुणीच हात धरू

वेड असावं

वेड असावं.. वेड असावं पळण्याचं साऱ्यांना सोबत घेऊन धावणारं, वेड असावं उडन्याचं अवघ्या गगनाला भेदणारं, वेड असावं प्रेमाचं एखाद्याच्या हृदयाला भिडणारंं, वेड असावं मैत्रीच दोस्तांच्या काळजात घर करणारं, वेड असावं जिंकण्याचं सगळ्यांची मनं ज़िंकणारं, आयुष्यात एकतरी वेड असावं, पाहून सर्वांना वेडं करून सोडणारं.. ©वृषाल भोसले

रिसेप्शन पार्टी

कॉलेजला असताना ७-८जणांचा ग्रुप आमचा, प्रत्येक जण अगदी जगावेगळा. कुणी गाण्यात लतादीदी, कुणी क्रिकेटमध्ये विराट, कुणी भाई  मन्या सुर्वे , कुणी यू.पी.एस.सीचा अभ्यास करणारा नांगरे पाटील, तर कुणी गरज नसताना संपूर्ण गावाच्या सीआयडीपेक्षा जास्त खबऱ्या ठेवणारा ए.सी.पी.प्रद्युमन. अगदी त्या दुनियादारी सिनेमासारखा. अन परिस्थिती पण अशी कि आमचा जीव जीच्यापाशी तिचा मात्र भलत्यापाशीच. आम्ही सगळं कॉलेजभर तिच्या माग फिरलो, होते नव्हते ते सगळे रोड रोमियो बाजूला केले. पण बाजी भलतंच पाखरू मारून गेलं.   आज बऱ्याच वर्षांनी सर्वांची एकत्र भेट झाली. आमची मैत्री एवढी की एकमेकांच्या घरी जाण, ज्याच्या घरी गेलोय त्याच्या घरच्यांबरोबर मिळून मिसळून २-४ दिवस राहणं हे सर्व आमच्यासाठी नेहमीचंच. त्यादिवशी आमच्या एका मित्राची रीसेप्शन पार्टी होती. लग्न पळून जाऊन केल्यामुळं एकदम साध्या पद्धतीने झालं होतं आणि कुणालाच बोलावलंपण नव्हतं. त्याची सर्व कसर काढायला म्हणून कि काय पण पार्टीचं नियोजन एकदम जोरदार होतं. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण होतं. एकटा शाकाहारी असल्यामुळं ग्रुपमधले सर्व जण

एक दिवस आठवणीतला

                परवा सहज तिला फोन केला.. येतोय पुण्यात कामानिमित्त. त्यावेळी नेमका तिचा एम.पी.एस.सी.चा पेपर होता.. आणि नंबर आला होता भोरला.. ती तिच्या बाबांना बोलावणार होती पेपरला जायला.. मोकळा असल्यामुळं मी म्हणलं "कशाला बाबांना एवढ्या लांब बोलावतीयेस. जाऊ ना आपण.. असही रविवारच आहे."         आता एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढाकार घ्यायचं कारण म्हणजे मला वाटलं असं किती लांब असेल भोर.. २५-३०किमी.. अन एखादा पेपर ३ तासांचा.. आणि रमतगमत परत पुणे. पण आदल्या दिवशी कळलं की अंतर ५५किमी आहे, २ पेपर आहेत आणि वेळ १०.३०-५..             माझ्या मनात आता कालवाकालव सुरु झाली. प्रवासाचा कधीच कंटाळा नव्हता पण पंचाईत अशी होती कि दिवसभर करायचं काय?? १००% भोरमध्ये आपल्याला बोर होणार. आता मैत्रीण जवळची, त्यामुळं नाही म्हणायचा विषय येत नाही. आणि दिलेला शब्द माघारी घेणं रक्तात नाही. झालं. सकाळी ८-८.३०ला निघायचं ठरलं.. मनातली चलबिचल काही थांबायला तयार नव्हती. त्या परिस्थितीमध्ये घाईगडबडीत मनाची समजूत घालण्यासाठी २-३पिक्चर मोबाईल मध्ये भरून हेडफोन आणि पोर्टेबल चार्जर घेतला.. अन ठरल्याप्रमाणे नि