Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

राजा माणूस : सौरभ

           पाचवीला गेल्यावर घरच्यांनी शिक्षणासाठी खेड्यातून शहरात अर्थात बारामतीला जायचा निर्णय घेतला. माझा दाखला तालुक्यातील नामवंत शाळेत म्हणजेच म.ए.सो.विद्यालयात घालण्यात आला. शाळेत आल्यावर इथलं सगळं वातावरण अगदी नवीन होतं. सवय जिल्हा परिषद शाळेची- इथे अगदी एकच शिक्षक तेही दोन वर्गांना मिळून. त्यांना वाटेल तो विषय दिवसभर चालणार. इथं आल्यावर मोठी पंचाईत झाली होती. प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे, दर अर्ध्या तासाला मास्तर बदलणार, वेळापत्रक ठरलेलं, हुशारीप्रमाणे(गुणपत्रकावरच्या) तुकड्याही वेगळ्या. ह्या सगळ्या गोंधळात आम्हाला काही नवीन मित्र मिळाले. प्रगतीनगरचा पल्ल्या, कसब्यातला अक्षय, कॅनॉल रोडचे भोई बंधू, अशोकनगरमधील देशपांडेंचे गौरव आणि देवदत्त अन बाकीचे भरपूर जण. पण या सगळ्यात वेगळे होते ते आमचे चंगु मंगू अर्थात ओंकार आणि सौरभ पवार. मी पाहिलेलीआणि शाळेतली एकमेव जुळ्या भावांची जोडी.        एक भाऊ आमच्या अ तुकडीत अन दुसरा ब तुकडीत. एकदम राम-लक्ष्मणाची जोडी. तब्येत दोघांचीही कायम कमीच, दिसायला दोघंही देखणे गडी. पण ना रामाला कधी सीता भेटली ना लक्ष्मणाने कधी शोधली. तसं बघायला गेलं तर दो

कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे..

कालही तो पाऊसच होता आजही कारण तो पाऊसच आहे, कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत, कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत, जनता कालही तीच होती आजही तीच आहे, कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत, काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती, आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत... खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत, एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना, आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा, पण जीवाला जपा, पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे.. आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा... कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे, तुमचाच मित्र, वृषाल