Skip to main content

Posts

गण्याची गेट

इंजिनीरिंगचा शेवटच्या दिवसांची मजाच काही वेगळी होती.. प्रत्येक पाखराला त्या घरट्यातून उडण्याची आस होती, अन सोबत्यांचा लळाही लागून गेला होता. (पुढे जाऊन काहींची लग्नही जुळली) अशाच वातावरणात शेवटचं सत्र सुरू होतं. पाहता पाहता जानेवारीचा मध्य ओलांडला होता. अचानक एक दिवस आमच्या विभाग प्रमुख वर्गात आल्या आणि म्हणाल्या की आपल्याला एक कॉन्फरन्स भरवायची आहे. स्वयंसेवक म्हणून तुमची काम करायची तयारी आहे का? सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. पण माझ्या मनात अचानक काय आलं काय माहीत शेजारी वर्गप्रमुख बसल्या होत्या. त्यांना हळूच म्हणलं आपल्याला गेट परीक्षेच्या अभ्यासाला सुट्टी मागा. त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये गेट म्हणजे खूपच प्रतिष्ठेची परीक्षा होती. विभागप्रमुख जशा हो म्हणल्या तसा मी एक अर्ज लिहिला वर्गाच्या वतीने आणि तो तास संपल्याबरोबर मॅडमच्या टेबलवर सर्वांच्या सह्यांसाहित हजर केला. घाईगडबडीत मॅडमने त्याला मान्यताही देऊन टाकली. जशी सुट्टी मान्य झाली तशी दुसऱ्या दिवशी सगळी पब्लिक गायब. मॅडमला काही समजेना कुठं गेली सगळी अचानक. स्थानिक विद्यार्थी म्हणून आम्हा २-४जणांना फोन करून बोलावण्यात आलं
Recent posts

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो, शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात, डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात. इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!" सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो. आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात. ४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..! रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते. जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित

"येकदाच घुसणार, भगवाच दिसणार..!!" - सोशल मीडिया वॉरियर्स

आजकाल भडक ओळी लिहून DSLR मधून काढून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर "एकदाच घुसणार, भगवाच दिसणार," "राडा करणारा पक्या", "आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस", अशा शब्दांनी तुटून पडतं..!! त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय.. 'ते ना तसलंच हाय', 'नुसतं फोटो टाकत असतंय,' , 'नुसत्या पोस्ट टाकत असतंय'. बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!! बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला? तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!! आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी

मन

उलटली वर्षे, बदललं बरंच काही, भरकटलं मन, फिरून आलं दिशा दाही, प्रयत्नही केला त्या भरकटलेल्या मनाला रमवायचा, पण त्याने कधी जगाचं ऐकलंच नाही, जीव त्याचा आजही फक्त तुझ्यातच होता, का कुणास ठाऊक पण त्याला तू सोडून कशावर प्रेम करणं जमलंच नाही... -वृषाल

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय, जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय, आज ६ महिने उलटून गेले, दररोज सकाळ होत असतेय, खूप सारी माणसं भेटतात असतायत, एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल, आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या, आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय, इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय, पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय, अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय, पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय, गप्पांच्या फडाची सवय आपल्याला, आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय, वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय, फक्त हिशोब लागला की त्रास होतोय.. तुमचा हरवलेला मित्र

राजा माणूस : सौरभ

           पाचवीला गेल्यावर घरच्यांनी शिक्षणासाठी खेड्यातून शहरात अर्थात बारामतीला जायचा निर्णय घेतला. माझा दाखला तालुक्यातील नामवंत शाळेत म्हणजेच म.ए.सो.विद्यालयात घालण्यात आला. शाळेत आल्यावर इथलं सगळं वातावरण अगदी नवीन होतं. सवय जिल्हा परिषद शाळेची- इथे अगदी एकच शिक्षक तेही दोन वर्गांना मिळून. त्यांना वाटेल तो विषय दिवसभर चालणार. इथं आल्यावर मोठी पंचाईत झाली होती. प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे, दर अर्ध्या तासाला मास्तर बदलणार, वेळापत्रक ठरलेलं, हुशारीप्रमाणे(गुणपत्रकावरच्या) तुकड्याही वेगळ्या. ह्या सगळ्या गोंधळात आम्हाला काही नवीन मित्र मिळाले. प्रगतीनगरचा पल्ल्या, कसब्यातला अक्षय, कॅनॉल रोडचे भोई बंधू, अशोकनगरमधील देशपांडेंचे गौरव आणि देवदत्त अन बाकीचे भरपूर जण. पण या सगळ्यात वेगळे होते ते आमचे चंगु मंगू अर्थात ओंकार आणि सौरभ पवार. मी पाहिलेलीआणि शाळेतली एकमेव जुळ्या भावांची जोडी.        एक भाऊ आमच्या अ तुकडीत अन दुसरा ब तुकडीत. एकदम राम-लक्ष्मणाची जोडी. तब्येत दोघांचीही कायम कमीच, दिसायला दोघंही देखणे गडी. पण ना रामाला कधी सीता भेटली ना लक्ष्मणाने कधी शोधली. तसं बघायला गेलं तर दो

कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे..

कालही तो पाऊसच होता आजही कारण तो पाऊसच आहे, कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत, कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत, जनता कालही तीच होती आजही तीच आहे, कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत, काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती, आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत... खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत, एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना, आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा, पण जीवाला जपा, पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे.. आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा... कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे, तुमचाच मित्र, वृषाल