Skip to main content

रिसेप्शन पार्टी

कॉलेजला असताना ७-८जणांचा ग्रुप आमचा, प्रत्येक जण अगदी जगावेगळा. कुणी गाण्यात लतादीदी, कुणी क्रिकेटमध्ये विराट, कुणी भाई मन्या सुर्वे , कुणी यू.पी.एस.सीचा अभ्यास करणारा नांगरे पाटील, तर कुणी गरज नसताना संपूर्ण गावाच्या सीआयडीपेक्षा जास्त खबऱ्या ठेवणारा ए.सी.पी.प्रद्युमन. अगदी त्या दुनियादारी सिनेमासारखा. अन परिस्थिती पण अशी कि आमचा जीव जीच्यापाशी तिचा मात्र भलत्यापाशीच. आम्ही सगळं कॉलेजभर तिच्या माग फिरलो, होते नव्हते ते सगळे रोड रोमियो बाजूला केले. पण बाजी भलतंच पाखरू मारून गेलं.
 आज बऱ्याच वर्षांनी सर्वांची एकत्र भेट झाली. आमची मैत्री एवढी की एकमेकांच्या घरी जाण, ज्याच्या घरी गेलोय त्याच्या घरच्यांबरोबर मिळून मिसळून २-४ दिवस राहणं हे सर्व आमच्यासाठी नेहमीचंच. त्यादिवशी आमच्या एका मित्राची रीसेप्शन पार्टी होती. लग्न पळून जाऊन केल्यामुळं एकदम साध्या पद्धतीने झालं होतं आणि कुणालाच बोलावलंपण नव्हतं. त्याची सर्व कसर काढायला म्हणून कि काय पण पार्टीचं नियोजन एकदम जोरदार होतं. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण होतं. एकटा शाकाहारी असल्यामुळं ग्रुपमधले सर्व जण नेहमीप्रमाणे "ह्याला गवत द्या रे"म्हनुन चिडवत होते. तेवढ्यात तिथं एका प्रतिष्ठित व्यक्तीचं आगमन झालं. प्रतिष्ठित ह्यामुळं की व्यक्ती आल्याबरोबर १०-१२ लोकांनी तिला गराडा घातला. आम्ही नीट पाहिलं तर तो आमचा शाळेतला मित्र पप्या... नुकत्याच झालेल्या निवडणुकीत साखर कारखान्याचा चेअरमन झाला होता. त्यामुळं फॉरच्युनर गाडी, पांढरा पुढारी पोशाख, गळ्यात सोन्याची चैन, हातात २-३अंगठ्या अन पायात कोल्हापूरी अशा पूर्ण पुढारी थाटात आला होता. गर्दी बाजूला झाल्यावर आम्ही त्याची निवांत भेट घेतली. त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती सुटाबुटामध्ये. पण पप्या एवढ्या दिवसातून भेटलाय म्हणल्यावर कशाला आम्ही त्याच्याबरोबर बोलतोय. पप्या बकिच्यांसाठी जरी चेअरमन साहेब असला तरी आमच्यासाठी जोशीकाकांच्या कैऱ्या चोरून आणणारा पप्याच होता. नेहमीच्या स्टाईलमध्ये आमचा दंगा सुरु झाला. ते सुटाबुटातलं बिचारं आमचा दंगा पाहून बाजूला जाऊन बसलं.

आमच्या दंग्यात,चवदार जेवणाच्या गडबडीत आणि स्पेशल संगीताच्या कार्यक्रमामुळं रिसेप्शन पार्टी थाटात पार पडली. तसं आम्ही आपापल्या गाड्या घेऊन माझ्या फार्महाऊसवर निघालो. रिसेप्शन हॉलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरचं २-३एकराच्या शेतीच्या बाजूला पावणेदोन गुंठ्यात बांधलेलं छोटंसं टुमदार फार्महाऊस म्हणजे आमचा नेहमीचा अड्डा होता. प्रवासाने थकलेले आणि पार्टीत केलेल्या दंग्यामुळं कंटाळलेले सर्वजण आल्याआल्या फ्रेश झाले तसे आपली आपली जागा पकडून बेडवर उताणे झाले. पण माझ्या उशिरा लक्षात आलं कि आमची चिमणी काही आलीच नाही. मनात चलबिचल सुरु झाली. 'कुठं राहिली असेल', काय झालं असेल' अशा असंख्य प्रश्नांनी मन काही क्षणांसाठी कावरबावऱ झालं. परत नीट विचार केला तर गाडीचा वगैरे काही प्रॉब्लेम झालेला नसावा. कारण तसं असतं तर कुणालातरी फोन आलाच असता आत्तापर्यंत. फ्रेंडसर्कल खूप मोठं असल्याने बाहेर जाऊन २-४फोन फिरवले तर लक्षात आलं की पाप्याबरोबर आलेली व्यक्ती दुसरं तिसरं कोण नसून आमची बाजी मारलेलं ते पाखरुच होतं ज्याला आजपर्यंत ग्रुपमधल्या कुणीच पाहिलेलं नव्हतं. आला राग जरा पण म्हणलं जाऊदे आपलीच आहे.

बराच वेळ वाट पहिली. शेवटी मीपण सोफ्यावर पडून घेतलं. कारण बेडवरच्या जागा आधीच सर्वांनी पटकावल्या होत्या. तेवढ्यात कुणाचातरी गाडीचा हॉर्न वाजला. पाहिलं तर मॅडम पोचल्या होत्या. आली तशी ती पण फ्रेश झाली. आता घरात २च व्यक्ती जाग्या होत्या त्या म्हणजे ती आणि मी. हो नाही म्हणत हाय हॅलो ने सुरुवात झाली. बोलण्यासारखं आमच्यात काही फारसं राहील नव्हतं पण तरी ओढून ताणून इकडच्या तिकडच्या गप्पा काढल्या. पण दोघांनाही बोर होतंय हे लक्षात आल्यावर मी पवित्रा बदलला. खूप दिवसांनी भेटलो होतो. त्यामुळं फोनमध्ये नवीन 'व्हाट्सअँप विडिओ'च छान कलेक्शन झालं होतं. बाकीच्यांना डिस्टर्ब नको म्हणून एक हेडफोन लावून दोघेही व्हिडिओज पाहत बसलो. एकामागून एक काही गंमतीदार, काही गंभीर, मनाला स्तब्ध करणारे व्हिडिओस चालू होते. थोड्यावेळाने मी एकदम दचकलो. अचानक काहीतरी मुलायम स्पर्श झाला खांद्यावर. नजर वळवून पाहिलं तर अगदी निष्पाप बाळासारखी ती खांद्यावर डोकं टेकवून गाढ झोपी गेली होती आणि तो स्पर्श तिचा काळ्याभोर मुलायम केसांचा होता. तिला उठवाव म्हणलं तर लागलेली एवढी छान झोप मोडू वाटत नव्हती. काही मिनिट तसाच व्हिडिओज पाहत मलाही झोप लागून गेली. . . . . . . अन तेवढ्यात आईने एक जोराचा धपाटा मारून माझी झोपमोड केली. "नालायका उठ. ८वाजले, कॉलेजला जायची वेळ झाली." खडबडून जागा झालो. पाहिलं तर शेजारी ना त्या मित्रांची गर्दी होती, ना ती होती, पण अजून एक सकाळ झाली होती, आणि कॉलेजला जायची वेळ झाली होती....

Comments

  1. Best ..but I don't get mystery behind why
    Everyone write 1st blog on lovestory .??

    ReplyDelete
    Replies
    1. Nothing like lovestory only.
      First blog was of experience in a new town.
      This one is kind of love story.
      Next will be something different..

      Delete
  2. Nothing like lovestory only.
    First blog was of experience in a new town.
    This one is kind of love story.
    Next will be something different..

    ReplyDelete
  3. एकच नंबर ����������������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप्याला मान. कारण आमचा बोलण्यात कुणीच हात धरू

एक परी असावी..

आयुष्यात एक परी असावी, एका नजरेत डोळ्यातले अश्रू पुसणारी अन् एका हाकेमध्ये मनात प्रेमळ धडकी भरणारी, एका स्मितहास्यात जगाचा विसर पाडणारी अन वेळ पडली तर एका धपाट्यात भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणणारी, दिवसातून विनाकारण १०वेळा ओरडली तरी केवळ एका वाक्याच्या कौतुकाने भारावून जाणारी.. आयुष्यात एकतरी परी असावी.. कधी कळत कधी नकळत तुम्हाला तुमच्यातूनच हरवणारी पण तरी एका गोड शब्दात जिंकल्याचा आभास करून देणारी.. वृषाल भोसले २०/०७/२०१६

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो, शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात, डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात. इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!" सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो. आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात. ४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..! रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते. जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित