Skip to main content

Posts

"येकदाच घुसणार, भगवाच दिसणार..!!" - सोशल मीडिया वॉरियर्स

आजकाल भडक ओळी लिहून DSLR मधून काढून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर "एकदाच घुसणार, भगवाच दिसणार," "राडा करणारा पक्या", "आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस", अशा शब्दांनी तुटून पडतं..!! त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय.. 'ते ना तसलंच हाय', 'नुसतं फोटो टाकत असतंय,' , 'नुसत्या पोस्ट टाकत असतंय'. बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!! बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला? तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!! आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी...

मन

उलटली वर्षे, बदललं बरंच काही, भरकटलं मन, फिरून आलं दिशा दाही, प्रयत्नही केला त्या भरकटलेल्या मनाला रमवायचा, पण त्याने कधी जगाचं ऐकलंच नाही, जीव त्याचा आजही फक्त तुझ्यातच होता, का कुणास ठाऊक पण त्याला तू सोडून कशावर प्रेम करणं जमलंच नाही... -वृषाल

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय, जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय, आज ६ महिने उलटून गेले, दररोज सकाळ होत असतेय, खूप सारी माणसं भेटतात असतायत, एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल, आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या, आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय, इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय, पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय, अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय, पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय, गप्पांच्या फडाची सवय आपल्याला, आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय, वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय, फक्त हिशोब लागला की त्रास होतोय.. तुमचा हरवलेला मित्र

राजा माणूस : सौरभ

           पाचवीला गेल्यावर घरच्यांनी शिक्षणासाठी खेड्यातून शहरात अर्थात बारामतीला जायचा निर्णय घेतला. माझा दाखला तालुक्यातील नामवंत शाळेत म्हणजेच म.ए.सो.विद्यालयात घालण्यात आला. शाळेत आल्यावर इथलं सगळं वातावरण अगदी नवीन होतं. सवय जिल्हा परिषद शाळेची- इथे अगदी एकच शिक्षक तेही दोन वर्गांना मिळून. त्यांना वाटेल तो विषय दिवसभर चालणार. इथं आल्यावर मोठी पंचाईत झाली होती. प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे, दर अर्ध्या तासाला मास्तर बदलणार, वेळापत्रक ठरलेलं, हुशारीप्रमाणे(गुणपत्रकावरच्या) तुकड्याही वेगळ्या. ह्या सगळ्या गोंधळात आम्हाला काही नवीन मित्र मिळाले. प्रगतीनगरचा पल्ल्या, कसब्यातला अक्षय, कॅनॉल रोडचे भोई बंधू, अशोकनगरमधील देशपांडेंचे गौरव आणि देवदत्त अन बाकीचे भरपूर जण. पण या सगळ्यात वेगळे होते ते आमचे चंगु मंगू अर्थात ओंकार आणि सौरभ पवार. मी पाहिलेलीआणि शाळेतली एकमेव जुळ्या भावांची जोडी.        एक भाऊ आमच्या अ तुकडीत अन दुसरा ब तुकडीत. एकदम राम-लक्ष्मणाची जोडी. तब्येत दोघांचीही कायम कमीच, दिसायला दोघंही देखणे गडी. पण ना रामाला कधी सीता भेट...

कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे..

कालही तो पाऊसच होता आजही कारण तो पाऊसच आहे, कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत, कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत, जनता कालही तीच होती आजही तीच आहे, कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत, काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती, आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत... खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत, एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना, आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा, पण जीवाला जपा, पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे.. आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा... कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे, तुमचाच मित्र, वृषाल

एक परी असावी..

आयुष्यात एक परी असावी, एका नजरेत डोळ्यातले अश्रू पुसणारी अन् एका हाकेमध्ये मनात प्रेमळ धडकी भरणारी, एका स्मितहास्यात जगाचा विसर पाडणारी अन वेळ पडली तर एका धपाट्यात भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणणारी, दिवसातून विनाकारण १०वेळा ओरडली तरी केवळ एका वाक्याच्या कौतुकाने भारावून जाणारी.. आयुष्यात एकतरी परी असावी.. कधी कळत कधी नकळत तुम्हाला तुमच्यातूनच हरवणारी पण तरी एका गोड शब्दात जिंकल्याचा आभास करून देणारी.. वृषाल भोसले २०/०७/२०१६

तो इंजिनियर हो तुम..

....तो इंजिनियर हो तुम.... बॅग में सिर्फ एक नोटबुक ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, पॉकेट में दुसरे का पेन ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, हर सेमिस्टर में एक नयी नोटबुक लेना सिखो, उसके हर पन्ने पर कुछ लिखना सिखो, हर टीचर से मिलो तो वो खोले तुम्हारा नोटबुक, हर पन्ने पर नया सब्जेक्ट देखे उस टीचर कि निगाहे, जो अपने नोटबुक में शायरिया ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, बॅग में सिर्फ एक नोटबुक ले कर चल रहे हो तो इंजिनियर हो तुम, तो इंजिनियर हो तुम... दो लेक्चर के अटेंडन्स के लिये सेमिनार दे रहे हो तो इंजिनियर हो तुम, एक प्रॉक्झी के लिये भिक मांग रहे हो तो तो इंजिनियर हो तुम, एक हफ्ते में ४लेक्चर कर के शान से रहना सिखो, तुम डिफॉल्टर बन के नोटीस बोर्ड पर झलकना सिखो, हर टीचर से मिलो तो टीचर खोले अपना अटेंडन्स शीट, हर दिन मारी हुई नयी प्रॉक्झी देखे उस टीचर कि निगाहे, जो अपने मोबाईल मे अटेंडन्स की कॅलक्युलेशन कर रहे हो तो इंजिनियर हो तुम, दो लेक्चर के अटेंडन्स के लिये सेमिनार दे रहे हो तो इंजिनियर हो तुम.... तो इंजिनियर हो तुम.... ©वृषाल भोसले