Skip to main content

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय,
जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय,

आज ६ महिने उलटून गेले,
दररोज सकाळ होत असतेय,
खूप सारी माणसं भेटतात असतायत,
एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल,

आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या,
आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय,

इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय,
पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय,

अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय,
पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय,

गप्पांच्या फडाची सवय आपल्याला,
आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय,

वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय,
फक्त हिशोब लागला की त्रास होतोय..

तुमचा हरवलेला मित्र

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"येकदाच घुसणार, भगवाच दिसणार..!!" - सोशल मीडिया वॉरियर्स

आजकाल भडक ओळी लिहून DSLR मधून काढून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर "एकदाच घुसणार, भगवाच दिसणार," "राडा करणारा पक्या", "आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस", अशा शब्दांनी तुटून पडतं..!! त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय.. 'ते ना तसलंच हाय', 'नुसतं फोटो टाकत असतंय,' , 'नुसत्या पोस्ट टाकत असतंय'. बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!! बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला? तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!! आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी...

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो, शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात, डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात. इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!" सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो. आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात. ४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..! रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते. जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित...

रिसेप्शन पार्टी

कॉलेजला असताना ७-८जणांचा ग्रुप आमचा, प्रत्येक जण अगदी जगावेगळा. कुणी गाण्यात लतादीदी, कुणी क्रिकेटमध्ये विराट, कुणी भाई  मन्या सुर्वे , कुणी यू.पी.एस.सीचा अभ्यास करणारा नांगरे पाटील, तर कुणी गरज नसताना संपूर्ण गावाच्या सीआयडीपेक्षा जास्त खबऱ्या ठेवणारा ए.सी.पी.प्रद्युमन. अगदी त्या दुनियादारी सिनेमासारखा. अन परिस्थिती पण अशी कि आमचा जीव जीच्यापाशी तिचा मात्र भलत्यापाशीच. आम्ही सगळं कॉलेजभर तिच्या माग फिरलो, होते नव्हते ते सगळे रोड रोमियो बाजूला केले. पण बाजी भलतंच पाखरू मारून गेलं.   आज बऱ्याच वर्षांनी सर्वांची एकत्र भेट झाली. आमची मैत्री एवढी की एकमेकांच्या घरी जाण, ज्याच्या घरी गेलोय त्याच्या घरच्यांबरोबर मिळून मिसळून २-४ दिवस राहणं हे सर्व आमच्यासाठी नेहमीचंच. त्यादिवशी आमच्या एका मित्राची रीसेप्शन पार्टी होती. लग्न पळून जाऊन केल्यामुळं एकदम साध्या पद्धतीने झालं होतं आणि कुणालाच बोलावलंपण नव्हतं. त्याची सर्व कसर काढायला म्हणून कि काय पण पार्टीचं नियोजन एकदम जोरदार होतं. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण होतं. एकटा शाकाहारी असल्यामुळं ग्रुपमधले...