Skip to main content

कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे..

कालही तो पाऊसच होता आजही कारण तो पाऊसच आहे,

कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत,

कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत,

जनता कालही तीच होती आजही तीच आहे,

कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत,

काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती,
आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत...

खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत,
एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना,
आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा,
पण जीवाला जपा,
पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे..

आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा...
कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे,


तुमचाच मित्र,
वृषाल


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप...

एक दिवस आठवणीतला

                परवा सहज तिला फोन केला.. येतोय पुण्यात कामानिमित्त. त्यावेळी नेमका तिचा एम.पी.एस.सी.चा पेपर होता.. आणि नंबर आला होता भोरला.. ती तिच्या बाबांना बोलावणार होती पेपरला जायला.. मोकळा असल्यामुळं मी म्हणलं "कशाला बाबांना एवढ्या लांब बोलावतीयेस. जाऊ ना आपण.. असही रविवारच आहे."         आता एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढाकार घ्यायचं कारण म्हणजे मला वाटलं असं किती लांब असेल भोर.. २५-३०किमी.. अन एखादा पेपर ३ तासांचा.. आणि रमतगमत परत पुणे. पण आदल्या दिवशी कळलं की अंतर ५५किमी आहे, २ पेपर आहेत आणि वेळ १०.३०-५..             माझ्या मनात आता कालवाकालव सुरु झाली. प्रवासाचा कधीच कंटाळा नव्हता पण पंचाईत अशी होती कि दिवसभर करायचं काय?? १००% भोरमध्ये आपल्याला बोर होणार. आता मैत्रीण जवळची, त्यामुळं नाही म्हणायचा विषय येत नाही. आणि दिलेला शब्द माघारी घेणं रक्तात नाही. झालं. सकाळी ८-८.३०ला निघायचं ठरलं.. मनातली चलबिचल काही थांबायला तयार नव्हती. त्या परिस्थितीमध्ये घाईगडबडीत मनाची समजूत घालण्यासाठी २-३प...

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय, जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय, आज ६ महिने उलटून गेले, दररोज सकाळ होत असतेय, खूप सारी माणसं भेटतात असतायत, एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल, आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या, आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय, इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय, पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय, अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय, पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय, गप्पांच्या फडाची सवय आपल्याला, आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय, वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय, फक्त हिशोब लागला की त्रास होतोय.. तुमचा हरवलेला मित्र