Skip to main content

"येकदाच घुसणार, भगवाच दिसणार..!!" - सोशल मीडिया वॉरियर्स

आजकाल भडक ओळी लिहून DSLR मधून काढून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर "एकदाच घुसणार, भगवाच दिसणार," "राडा करणारा पक्या",
"आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस", अशा शब्दांनी तुटून पडतं..!!

त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय..
'ते ना तसलंच हाय', 'नुसतं फोटो टाकत असतंय,' , 'नुसत्या पोस्ट टाकत असतंय'.
बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!!

बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला?

तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!!

आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी मा. चहावाले काका आणि अंबानी मामा यांच्या संयुक्त विद्यमाने १.५जीबी डेटा  दररोज उपलब्ध आहे तेही कवडीमोल भावात, तिच्याकडेही आणि त्याचकडेही..!!

हे झालं फक्त उपलब्धतेविषयी..

वापराकडे पाहायला गेलं तर कुणी राज्यसभेत काय चाललंय ह्याची माहिती घ्यायला इंस्टा वर अकाउंट काढत नाही, किंवा शाळेत मास्तर नीट शिकवत नाही म्हणून तो धडा युट्युबवर जाऊन पाहत नाही (पाहणारेही आहेत पण प्रमाण खूप उपेक्षनीय), करतं ते आपला फोटो लोकांनी पहावा, लाईक करावा, छान कमेंट्स कराव्या, प्रसंगी मेसेज यावा ह्याच अपेक्षेने. सोशल मीडियाची स्वतःची काही इंजिन्स असतात जी तुम्ही जे साहित्य(#content) पाहता, शोधता त्या विषयांना अनुसारच ती तुम्हाला पुढे गोष्टी दाखवत जातं. तुम्हाला त्याची सवय लागून त्याचं व्यसन कधी होतं तुमचं तुम्हालापण समजत नाही. हे व्यसन लय जालीम बरं.
एकवेळ दारू परवडली पण हे लय बेकार..

पण आज ह्या व्यसनातून रोजगार तरुण मिळत असेल तर?? गावाकडं १००रु मध्ये एडिट करून देतात पोरं फोटो, अशी ७-८गोळा केली आणि त्यांच्या कौशल्याला एक व्यावसायिक टच दिला की एक ग्राफिक्स डिझाईन कंपनी चालू होऊ शकते. फोटो एडिटिंगचे तसेच फोटोग्राफीचे दर आज गगनाला भिडत आहेत. व्यावसायिक डिजिटल आणि सोशल मीडियातील २ तज्ज्ञ लोक असतील तर हे व्यसन आज पैसा कमवायचं साधन कधी बनून जाईल समजणार पण नाही.

तुम्ही म्हणाल फोटो काढणाऱ्याचं आणि एडिटिंग करणाऱ्याचं पोट भरलं. ज्याच्यासाठी जाळ धुरर वाल्या कमेंट्स आल्या त्या फोटो मधल्या सेलेब्रिटीचा नुसतं फेमस होऊन उपयोग ??? डिजिटल व्यवसायात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नामक एक ट्रेंड उभा ठाकतोय. हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दुसर तिसरं कोणी नसून तुमच्या आमच्यातीलचं लोकं असतात ज्यांचे काही हजारांमध्ये फॉलोवर्स असतात. आपल्या कारामतींमुळे ती समाजात प्रचलित असतात. थोडक्यात हे छोटेखानी सेलेब्रिटीच असतात..

आजचं युग हे साहित्य(Content) युग आहे. उद्योगधंदा सुरू केला तरी त्याला चर्चेत आणायला आज चौकात फ्लेक्स लावून भागत नाही. माणूस आज चौकापेक्षा फोन आणि सोशल मीडियावर जास्त सापडतो. डिजिटल आणि सोशल मिडियावरची ओळख खूप महत्त्वाची असते. त्यासाठी तुम्हाला सिनेतारका परवडत नसतील तर किमान किमतीत हे छोटेखानी सेलेब्रिटीच कामी येतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, धुरर करणारा विक्या, त्याचे फोटो काढून एडिटिंग करणारे मित्र ह्यांना बेरोजगारांचा ठप्पा लावून हिणवू नका. त्यांना फक्त एक ब्रेक ची गरज आहे. समाजाचं खोटं भान असेल आणि युवा पिढीची खोटी काळजी असल्याचा आव आणू नका. काही करू वाटलंच, त्यांच्या आधुनिकतेला वाव द्या..  डॉक्टर, इंजिनियर, मॅनेजर अभ्यास करून होतीलच ते, पण त्या नाशवंत रोजगराबरोबर हसत खेळत पैसा कमावण्याच्या साधनांचा उलगडा करून द्या..!!


- वृषाल भोसले
२६/११/२०१८
+91 7798809900


Comments

  1. बरोबर आहे भावा✌

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Chhan lihilays... saral Sashi sopi bhasha pan mudda patavnari...

    ReplyDelete
  4. Replies
    1. Ive already started working on this Idea sir.. :)

      Delete
  5. 👍 खरंय वृषाल!!👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप...

एक दिवस आठवणीतला

                परवा सहज तिला फोन केला.. येतोय पुण्यात कामानिमित्त. त्यावेळी नेमका तिचा एम.पी.एस.सी.चा पेपर होता.. आणि नंबर आला होता भोरला.. ती तिच्या बाबांना बोलावणार होती पेपरला जायला.. मोकळा असल्यामुळं मी म्हणलं "कशाला बाबांना एवढ्या लांब बोलावतीयेस. जाऊ ना आपण.. असही रविवारच आहे."         आता एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढाकार घ्यायचं कारण म्हणजे मला वाटलं असं किती लांब असेल भोर.. २५-३०किमी.. अन एखादा पेपर ३ तासांचा.. आणि रमतगमत परत पुणे. पण आदल्या दिवशी कळलं की अंतर ५५किमी आहे, २ पेपर आहेत आणि वेळ १०.३०-५..             माझ्या मनात आता कालवाकालव सुरु झाली. प्रवासाचा कधीच कंटाळा नव्हता पण पंचाईत अशी होती कि दिवसभर करायचं काय?? १००% भोरमध्ये आपल्याला बोर होणार. आता मैत्रीण जवळची, त्यामुळं नाही म्हणायचा विषय येत नाही. आणि दिलेला शब्द माघारी घेणं रक्तात नाही. झालं. सकाळी ८-८.३०ला निघायचं ठरलं.. मनातली चलबिचल काही थांबायला तयार नव्हती. त्या परिस्थितीमध्ये घाईगडबडीत मनाची समजूत घालण्यासाठी २-३प...

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय, जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय, आज ६ महिने उलटून गेले, दररोज सकाळ होत असतेय, खूप सारी माणसं भेटतात असतायत, एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल, आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या, आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय, इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय, पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय, अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय, पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय, गप्पांच्या फडाची सवय आपल्याला, आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय, वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय, फक्त हिशोब लागला की त्रास होतोय.. तुमचा हरवलेला मित्र