Skip to main content

"करियर बरोबर बदलते जीवन"

काल करिअरच नाव घेऊन घरातून बाहेर पडलोय,
जग पहायचंय म्हणून आपल्या माणसांना सोडून आलोय,

आज ६ महिने उलटून गेले,
दररोज सकाळ होत असतेय,
खूप सारी माणसं भेटतात असतायत,
एकच आशा असते की आज कुणीतरी आपलं भेटेल, २ शब्द आपुलकीचे बोलेल,

आईच्या हातच्या ४ चपात्या दिवसभर पुरायच्या,
आज ४ वेळा खायला मिळालं तरी त्याचं मनाला समाधान नसतंय,

इथं कुणी गोड बोललं तर एवढं नक्की कि त्याच तुमच्याकडं काहीतरी काम असतंय,
पण निसर्गनियमा प्रमाणे त्यालाही त्याच गोडीत उत्तर देऊन गर्दीत पुढे जात असतोय,

अशा सगळ्या गडबडीत दिवस मावळून गेलेला असतोय,
पण दररोजची ती आशा तशीच राहिलेली असतेय,

गप्पांच्या फडाची सवय आपल्याला,
आज बोलायचं सोडा आठवण आली तर रडायला खांदा द्यायला पण कोण नसतंय,

वेळ वाया गेल्याचं दुःख कधीच नसतंय,
फक्त हिशोब लागला की त्रास होतोय..

तुमचा हरवलेला मित्र

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप...

एक परी असावी..

आयुष्यात एक परी असावी, एका नजरेत डोळ्यातले अश्रू पुसणारी अन् एका हाकेमध्ये मनात प्रेमळ धडकी भरणारी, एका स्मितहास्यात जगाचा विसर पाडणारी अन वेळ पडली तर एका धपाट्यात भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणणारी, दिवसातून विनाकारण १०वेळा ओरडली तरी केवळ एका वाक्याच्या कौतुकाने भारावून जाणारी.. आयुष्यात एकतरी परी असावी.. कधी कळत कधी नकळत तुम्हाला तुमच्यातूनच हरवणारी पण तरी एका गोड शब्दात जिंकल्याचा आभास करून देणारी.. वृषाल भोसले २०/०७/२०१६